Pearl Farming Business : आपण गळ्यामध्ये घालतो किंवा सौंदर्यप्रसाधनांमध्ये बघतो तो मोती शिंपल्यातून तयार होतो. शिंपले किंवा शिंपला हा पाण्यामध्ये असणारा एक सजीव प्राणी असून त्यामध्ये नैसर्गिकरित्या वाळूचा किंवा मातीचा कण गेला की त्यापासून मोती तयार होतो असं आपण ऐकलं असेल.
पण मोती तयार होण्याची प्रक्रिया खूप लांबलचक असते. नैसर्गिकरित्या मोती तयार होण्यासाठी २ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. पण सध्या महाराष्ट्रात आणि देशात गोड्या पाण्यात, शिंपल्यावर सर्जरी करून मोतीपालन केले जाते. जसं नैसर्गिकरित्या शिंपल्यामध्ये वाळूचा कण जातो तसंच शिंपल्यामध्ये न्युक्लिअस टाकला जातो त्या प्रक्रियेला सर्जरी म्हणतात. सर्जरी केल्यानंतर मोती बनण्याची प्रोसेस सुरू होते.
सध्याच्या काळात डिझाईनर मोती बनवण्याकडे मोतीपालकांचा जास्त कल आहे. कारण डिझाईनर मोती बनण्यासाठी १ वर्षांच्या आसपास कालावधी लागतो. तर गोल किंवा राऊंड मोती तयार होण्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागतो.