Farm School : मधमाशी आपल्याला केवळ दिसते तशी नसते. मधमाशांच्या आयुष्याबद्दल किंवा जीवनाबद्दल विचार केला तर बऱ्याच रंजक गोष्टी तुम्हाला समजतील. अशाच काहीशा रंजक गोष्टी...!
मधमाशीचे जीनव
मधमाशी जन्माला आल्यापासून केवळ ४० दिवस जगते. या ४० दिवसांत ती वेगवेगळे काम करते. कधी राणी माशीची काळजी घेते, कधी मध गोळा करते, कधी पोळ्याची डागडुजी करते तर कधी पोळ्याच्या रक्षणाचे काम करते.
मधमाशींमधील संवाद
मधमाशा आपापले काम करत असताना त्यांच्यामध्ये कमालीची शिस्त बघायला मिळते. ज्यामध्ये मधमाशा आपल्याला ठरवून दिलेली कामं चोखपणे पूर्ण करतात. एकमेकांना संवाद साधण्यासाठी त्या विशिष्ट प्रकारचा डान्स करतात. त्याला वॅगल डान्स असे म्हणतात. या डान्सच्या माध्यमातून ते फुलांची दिशा दुसऱ्या मधमाशांना सांगत असतात.
एक चमचा मध
एक मधमाशी आपल्या ४० दिवसांच्या जीवनात केवळ अर्धा चमचा मध तयार करते. ही तिच्या आयुष्याची कमाई असते. यासाठी तिला हजारो फुलांना भेटी द्याव्या लागतात
राणी माशी
मधमाशी जरी ४० दिवस जगत असली तरी राणी माशी मात्र २ वर्षांपेक्षा जास्त काळ जगते. कारण ती केवळ रॉयल जेली नावाचा पदार्थ खाते. आणि हा पदार्थ तिला इतर मधमाशा पुरवतात. राणी मधमाशी ही पोळ्यातील सर्व मधमाशांची आई असते. कारण राणी मधमाशीने घातलेल्या अंड्यापासूनच या मधमाशा तयार होतात. पोळ्यात केवळ राणी माशीच अंडी घालू शकते.
बायप्रोडक्ट्स
मधमाशीपालनातून अनेक उपपदार्थ म्हणजे बायप्रोडक्ट तयार करता येऊ शकतात. ज्यामध्ये पोलन्स, रॉयल जेली, मध आणि इतर पदार्थांचा सामावेश असतो. व्यवसायिक पद्धतीने मधमाशीपालन केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा कमावता येऊ शकतो.
#मधमाशी #BeeFacts #HoneyBee #Madhmashi #Pollination #SaveTheBees #BeeLove #NatureFacts #EcoFriendly #BeesAndFlowers #SustainableFarming #Biodiversity #HoneyLovers #NaturalSweetener #OrganicHoney #BeesAreImportant #HealthyLiving #FarmToFork #EnvironmentalAwareness #BeeLife