Farm School : तुम्ही शहरात राहून मध किंवा इतर पदार्थ विकत घेता, पण तो मध शुद्ध असतो? तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक अन्नामध्ये काही ना काही भेसळ असते हे तरी तुम्हाला माहिती आहे का? या भेसळयुक्त पदार्थांमुळे मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
रस्त्यावरून जाताना किंवा दुकानामध्ये ठेवलेला मध किती शुद्ध आहे याची कल्पना आपल्याला नसते. त्यामुळे खात्रीचा आणि शुद्ध मध खायचा असेल तर तुम्हाला तो शेतकऱ्यांकडून घेतला पाहिजे. पण तुम्ही शहरात राहत असाल आणि तुम्हालाही घरगुती, शुद्ध मध हवा असेल तर तुम्ही तो घरच्या घरी तयार करू शकता?
कसं शक्य आहे?
शहरात मधमाशी पालन (Urban Beekeeping) हा एक नवीन आणि फायदेशीर जोड व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. अनेकांना वाटते की, मधमाशी पालन फक्त गावात किंवा शेतीतंच शक्य आहे, पण आता टेरेस गार्डन, बाल्कनी किंवा मोकळ्या छतावर देखील मधमाशी पालन सहज करता येते. शहरांमध्ये भरपूर फुलझाडे असल्यामुळे मधमाश्यांना आवश्यक अन्न सहज मिळते आणि त्या शहरी वातावरणातही चांगल्या प्रकारे वाढतात.
घरच्या घरी शुद्ध मध उत्पादन करण्याची ही एक उत्तम संधी आहे. मधमाशी पालनामुळे केवळ शुद्ध आणि नैसर्गिक मध मिळत नाही, तर अतिरिक्त उत्पन्नाचे साधन देखील तयार होते. याशिवाय मधमाश्या फुलांवर परागीभवन करत असल्यामुळे टेरेस गार्डनमधील झाडांची वाढ आणि उत्पादन सुधारते, ज्यामुळे पर्यावरणालाही मोठा फायदा होतो.
मधमाशी पालन सुरू करण्यासाठी योग्य प्रशिक्षण, सुरक्षित आणि शांत जागा, तसेच योग्य मधमाशी बॉक्स आणि साधने आवश्यक असतात. सुरुवातीला छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करून नंतर हळूहळू त्याचा विस्तार करता येतो. योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास शहरात मधमाशी पालन व्यवसाय हा एक स्थिर आणि नफ्याचा पर्याय ठरू शकतो.
तुम्हालाही शहरात राहून मधमाशी पालन करायचे असल्यास आणि त्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग घ्यायचे असल्यास खालील नंबरवर संपर्क करा.
FSAS - 7823854112
Farm School
HoneyBeekeeping
Honey
Beekeeping
Bee
Agriculture
Urban Farming
Organic Honey
Organic Food
Health