Farm School: मोती शेती किंवा मोतीपालन हा शेतीला जोड म्हणून करता येणारा एक चांगला व्यवसाय आहे. अनेक शेतकरी मोती शेतीकडे वळत आहेत कारण योग्य पद्धतीने केल्यास यातून चांगला नफा मिळवता येतो. पण त्यासाठी सर्वात आधी मोत्याची किंमत कशी ठरते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मोत्याची किंमत मुख्यतः आकार, चमक, पृष्ठभाग आणि रंग यावर ठरते. एकसारखा गोलाकार (Round) मोती बाजारात सर्वाधिक किमतीत विकला जातो. साधारण 4–6 mm आकाराचे मोती सामान्य आकाराचे मानले जातात व भाव ही ठरावीक मिळतो तर 10 mm पेक्षा मोठे मोती अधिक महाग विकले जातात. तसेच मोती जितका चमकदार आणि उजळ, तितकी त्याची किंमत वाढते. मोत्यावर डाग, खड्डे किंवा खरचटलेले चिन्ह असल्यास किमतीत घट होण्याची शक्यता असते. काही दुर्मिळ रंग जसे सोनेरी (Golden) किंवा काळा (Black) मोती यांना विशेष मागणी असल्याने जास्त दर मिळतो.कल्चर्ड पर्ल म्हणजे गोड्या पाण्यातल्या मोती,नेचुरल पर्ल अशे अनेक प्रकारचे मोती बाजारात मागणी प्रमाणे वेगवेगळा भाव देऊन जातात.
मोती शेतीत नफा मिळवण्यासाठी गोलाकार मोत्यांचे उत्पादन घेणे जे योग्य नूक्लीअस च्या मदतीने सहज शक्य होते , योग्य बाजारपेठ निवडणे व मोत्यांना value addition देणे खूप महत्त्वाचे आहे. गणपती, अक्षरे किंवा डिझायनर ह्यासारख्य कस्टमाईज आकाराचे मोती तयार करून विकल्यास जास्त नफा मिळू शकतो. तसेच बल्क मध्ये विक्री आणि योग्य प्रशिक्षण घेतल्यास हा व्यवसाय अधिक यशस्वी होऊ शकतो.
योग्य मार्गदर्शन आणि तांत्रिक माहिती मिळाल्यास मोती शेती हा नफ्याचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.Farmschool च्या मोतीपालन प्रशिक्षणामुळे नफा कारक व्यवसाय करणं अधिकच सोप्पं होत.