Farm School : मधमाशी ही निसर्गातील सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. कारण जगात कोणत्याही वनस्पतीपासून जी अन्ननिर्मिती होते. त्या अन्नाच्या निर्मितीमध्ये मधमाशांचा मोठा वाटा असतो. आपल्याला माहिती असेल, परागीभवनाशिवाय अन्ननिर्मिती होऊ शकत नाही. पण निसर्गातील जवळपास ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत परागीभवन हे मधमाशांकडून केले जाते.
निसर्गात केवळ मधमाशीच परागीभवन करते असे आहे का? तर नाही. छोट्याछोट्या किटकांद्वारे, वाऱ्याच्या माध्यमातून, पक्षांच्या माध्यमातूनही परागीभवन होते. पण मधमाशांकडून सर्वांत जास्त परागीभवन केले जाते. यासोबतच जगातील मधमाशा नष्ट झाल्या तर त्यानंतर ४ वर्षांत मानवजात नष्ट होईल असं अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाला होता.
कारण, मधमाशांनी परागीभवन केले नाही तर त्यानंतर पिकांच्या उत्पादनात घट होईल आणि अन्ननिर्मितीला खीळ बसेल. परिणामी मानवाला खायला अन्न कमी पडेल व मानवजात नष्ट होईल असा त्याचा अर्थ होता.
अशा प्रकारे मधमाशी ही निसर्गातील सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. त्यामुळे मधमाशांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. मधमाशीपालनामध्येसुद्धा खूप मोठ्या संधी येणाऱ्या काळात निर्माण होत आहेत.
पण मधमाशीपालन करायचे असेल अन् त्यातून चांगला नफा कमवायचा असेल तर तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. फार्म स्कूलकडूनही मधमाशीपालनाचे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
#मधमाशी #BeeFacts #HoneyBee #Madhmashi #Pollination #SaveTheBees #BeeLove #NatureFacts #EcoFriendly #BeesAndFlowers #SustainableFarming #Biodiversity #HoneyLovers #NaturalSweetener #OrganicHoney #BeesAreImportant #HealthyLiving #FarmToFork #EnvironmentalAwareness #BeeLife