सोलार डिहायड्रेशन व्यवसाय: ड्राय प्रोडक्टसाठी किती कच्चा माल लागतो?

04 Jun 2026

सोलार डिहायड्रेशन व्यवसाय: ड्राय प्रोडक्टसाठी किती कच्चा माल लागतो?

Solar Dehydration Business : कृषी उत्पादनांचे शेल्फ लाइफ वाढवणे, अन्नाची नासाडी कमी करणे आणि उत्पादनाला अधिक बाजारमूल्य मिळवून देणे यासाठी सोलार डिहायड्रेशन (Solar Dehydration) हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे. फळे, भाज्या, पालेभाज्या आणि फुलांच्या पाकळ्या यांमधील अतिरिक्त आर्द्रता (Moisture) नियंत्रित पद्धतीने कमी करून त्यांचे ड्राय प्रोडक्ट तयार केले जाते.

ड्राय उत्पादन तयार करताना प्रत्येक कमोडिटीचा Drying Ratio वेगळा असतो. उदाहरणार्थ, १ किलो ड्राय आंबा तयार करण्यासाठी सुमारे १२ किलो कच्चा आंबा लागतो, तर १ किलो ड्राय टोमॅटोसाठी सुमारे १८ किलो ताजे टोमॅटो आवश्यक असतात. त्याचप्रमाणे केळी, अननस, सफरचंद, स्ट्रॉबेरी, फणस, कारले, आले, लिंबू, द्राक्षे, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, शेवग्याची पाने आणि गुलाब पाकळ्या यांचेही ड्रायिंग रेशो वेगवेगळे असतात.

हा फरक मुख्यतः संबंधित उत्पादनातील Moisture Level वर अवलंबून असतो. ज्या उत्पादनात पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यासाठी अधिक कच्चा माल लागतो. त्यामुळे सोलार डिहायड्रेशन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी प्रत्येक कमोडिटीचे ड्रायिंग रेशो समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


फळे (Fruits Category)
कमोडिटी    1 किलो ड्राय प्रोडक्टसाठी लागणारा कच्चा माल
आंबा     -12 किलो कच्चा आंबा
केळी    -10 किलो कच्ची केळी
अननस    -10 किलो कच्चा अननस
सफरचंद    -10 किलो कच्चे सफरचंद
स्ट्रॉबेरी    -10 किलो कच्ची स्ट्रॉबेरी
फणस    -10 किलो कच्चा फणस

भाजीपाला (Vegetable Category)

टोमॅटो    -18 किलो कच्चे टोमॅटो
कारले    -10 किलो कच्चे कारले
आले      -6 किलो कच्चे आले
ड्राय लिंबू   -10 किलो ताजी लिंबे
काळी द्राक्षे (मनुके)  -5 किलो ताजी द्राक्षे

पालेभाज्या (Leafy Vegetables Category)

कढीपत्ता    -15 किलो कच्चा कढीपत्ता
कोथिंबीर    -15 किलो कच्ची कोथिंबीर
पुदिना    -15 किलो कच्चा पुदिना
शेवग्याची पाने    -15 किलो ताजी पाने
गुलाब पाकळ्या    -10 किलो ताज्या पाकळ्या

For More Details - 7823854112
Visit - farmsschool.com

Recommended Courses

Course Banner

Solar Dehydration (सोलर ड्रायर)

Rs.2999
2h 34m