Farm School:
वर्षातून एक वेळ अशी येते की टोमेटो चे भाव अगदीच खाली उतरतात ज्याने ग्राहक खुश होत असले तरी बळीराजा मात्र हवालदिल होतो .
टोमॅटोचे दर कमी झाल्यावर अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. अशा वेळी निराश न होऊन आपण सोलर ड्रायर चा विचार करून टोमॅटो सुकवणे हा एक प्रभावी टोमॅटोसाठी व्हॅल्युएडीशन पर्याय ठरू शकतो. अनेकांना प्रश्न पडतो की १ किलो टोमॅटो पावडर बनवायला किती टोमॅटो लागतात? साधारणपणे १७–१८ किलो ताजे टोमॅटो वापरून १ किलो सुकवलेली टोमॅटो पावडर तयार करता येते.
टोमॅटोमध्ये साधारण ९०% पाण्याचा घटक असतो. त्यामुळे सोलर ड्रॉयर मध्ये टोमॅटो सुकवण्याची प्रक्रिया केल्यावर त्यातील पाणी कमी होऊन फक्त घन पदार्थ उरतो. यामुळेच सुकवल्यानंतर वजन कमी होते आणि पावडर तयार होते. योग्य सोलर ड्रायिंग टेक्नोलॉजी वापरल्यास टोमॅटो स्वच्छ, सुरक्षित आणि पोषक तत्व टिकवून सुकवता येतात.
टोमॅटो सुकवण्याचे फायदे अनेक आहेत. सुकवलेले टोमॅटो आणि टोमॅटो पावडर जास्त दिवस टिकतात, त्यामुळे पोस्ट हार्वेस्ट लॉस कमी होतो. तसेच पावडर स्वरूपात विक्री केल्यास फ्रेश टोमॅटोपेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता असते. ही पावडर फ़ूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, हॉटेल्स आणि घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरते. त्यामुळे टोमॅटो व्हॅल्युएडिशन बिज़नेस हा शेतकऱ्यांसाठी चांगला उत्पन्नाचा मार्ग ठरू शकतो.
जर तुम्हाला टोमॅटो सुकवण्याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यायचे असेल, तर योग्य मार्गदर्शन आणि हँड्स -ऑन सोलर ड्रायर ट्रेनिंग घेणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य प्रशिक्षणामुळे तुम्ही टोमॅटो प्रोसेसिंग बिज़नेस यशस्वीपणे सुरू करू शकता.