फार्म स्कूल हे शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येत २०२४ मध्ये स्थापन केलेले नवे स्टार्टअप आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती आणि प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कमीत कमी किंमतीत शेतकऱ्यांना नवनव्या व्यवसायाची दारं उघडी व्हावीत आणि या माध्यामतून नवे उद्योजक घडवण्यासाठी आणि त्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी फार्म स्कूल काम करते. शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या ग्रामीण-शहरी तरूणांसाठी, नव उद्योजकांसाठी, स्टार्टअप करू इच्छिणाऱ्यांसाठी, महिलांसाठी आणि महिला शेतकऱ्यांना या स्टार्टअपचा नक्कीच फायदा होईल ही अपेक्षा.
आम्ही केवळ कृषी व्यवसायाचा एक शैक्षणिक प्लॅटफॉर्म नाही तर नवे व्यवसाय तयार करून त्यांना स्पर्धेच्या युगात शाश्वत अन् स्वयंपूर्ण करण्यासाठी काम करतो. दिवसेंदिवस शेतीपासून दुरावत चाललेल्या तरूणांना पुन्हा कृषी क्षेत्राकडे वळवण्याचा आणि शेतीला स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.
फार्म स्कूलच्या माध्यमातून ग्रामीण महिला शेतकऱ्यांसाठी एक विशेष प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात विविध व्यवसायामध्ये इच्छुक असणाऱ्या महिला शेतकऱ्यांना फार्म स्कूल मोफत प्रशिक्षण आणि व्यवसाय स्वयंपूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन दिले जाणार आहे. येणाऱ्या एका वर्षात १ हजार महिला शेतकरी उद्योजिका निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. यासोबतच मार्केट लिंकेज, इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि विक्री व्यवस्था उभारून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.
ग्रामीण महिला शेतकऱ्यांचे कृषी क्षेत्रातील योगदान पाहता या महिलांचे आरोग्य आणि महिला शेतकऱ्यांचे शिक्षण यावरही फार्म स्कूलकडून काम केले जाणार आहे.
आम्ही ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो तीच आमच्या प्रत्येक कृतीला दिशा देतात — प्रामाणिकपणा, पारदर्शकता, शिक्षणाची समर्पित भावना आणि शेतकऱ्यांची प्रगती हेच आमचे ध्येय आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला उपयोगी, सोपी व समजण्यासारखी माहिती देऊन त्यांचे जीवन बदलणे आणि उपजीविका सुधारण्यावर आमचा विश्वास आहे.
आम्ही पर्यावरणास अनुकूल शेती तंत्रांचा प्रसार करतो, जे पर्यावरणाचे संरक्षण करतात आणि दीर्घकालीन कृषी यश सुनिश्चित करतात.
आमचा उद्देश शेतकऱ्यांमध्ये पाठिंबा, विश्वास आणि सामूहिक प्रगती यावर आधारित मजबूत समुदाय निर्माण करणे आहे.
आमच्या कार्यामागे एक ठाम उद्दिष्ट आहे — शेतकऱ्यांना सशक्त बनवणे. आम्ही अशा भविष्याची कल्पना करतो जिथे प्रत्येक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम होईल आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करेल.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष, परवडणारे आणि नाविन्यपूर्ण कृषी शिक्षण देऊन सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि समुदायाच्या आधाराने शाश्वत व कार्यक्षम शेती पद्धती वाढवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
शाश्वत आणि प्रगत शेतीसाठी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ज्ञान, तंत्रज्ञान आणि संधी पोहोचवणे, जेणेकरून ग्रामीण भारताची आर्थिक प्रगती साधता येईल.